दौंड -दौंड तालुक्यामध्ये करोनावर मात करण्यासाठी जर कोणी नियमांचा भंग करीत असेल तर त्यांच्याविरुद्ध कारवाई करा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले. देशमुख हे दौंड तालुक्यात आढावा घेण्यासाठी आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
डॉ. देशमुख यांनी यवत ग्रामीण रुग्णालय व दौंड नगरपरिषद क्षेत्रातील प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी तसेच राज्य राखीव पोलीस दलाच्या रेस्ट हाऊसमध्ये उपाययोजनांचा आढावा घेतला.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, डॉ. अशोक नांदापूरकर, डॉ. भगवान पवार, उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, गट विकास अधिकारी अमर माने, प्रभारी तहसीलदार एच. आर. म्हेत्रे उपस्थित होते.