इकडे लक्ष द्या

– ऑगस्ट २०१९ मध्ये म्युच्युअल फंडाचे पाच लाख खाती (पोर्टफोलिओ) वाढले आहेत. त्यामुळे एकूण खात्यांची संख्या ८.५३ कोटी झाली आहे. जुलैमध्ये ऑगस्टपेक्षा अधिक म्हणजे १०.२९ लाख खात्यांची भर पडली होती.

– आपण स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल तर हे लक्षात ठेवा. आपल्या खात्यात विशिष्ट रक्कम न राहिल्यास स्टेट बँक दंड आकारते. एक ऑक्टोबरपासून त्यात काही बदल झाले आहेत. पूर्वी सरासरी मासिक बॅलन्स ५००० रुपये होता, तो आता ३००० रुपये करण्यात आला आहे. (शहरांत) तरनिम शहरी भागात हाच बॅलन्स२००० रुपये तर ग्रामीण भागात तो १००० रुपये करण्यात आला आहे. तो तसा न राहिल्यास १५ रुपयांपर्यंत सेवा शुल्क लागू होणार आहे.

– विमा योजनांवर किती लाभ होऊ शकतो, याविषयी खोटे दावे करणारे फोन काही एजंट सध्या नागरिकांना करत आहेत. त्यावर नागरिकांनी अजिबात विश्वास ठेवू नये, असे आवाहन विमा उद्योगाचे नियंत्रण करणारी संस्था द इन्शुरन्स रेग्युलेटर अँड डेव्हलपमेंट ऑथोरीटी ऑफ इंडिया (इर्डा) ने केले आहे. आरबीआयआणि इतर सरकारी संस्थांकडूनफोन असल्याचे सांगून हे एजंट नागरिकांची फसवणूक करत आहेत, असे इर्डा ने म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.