प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 12 -करोना आणि त्याच्या व्हेरियंटनंतर आता स्वाइन फ्लूने डोके वर काढण्याला सुरुवात केली असून, 9-10 आणि 11 ऑगस्ट या तीन दिवसांत तब्बल 67 जण स्वाइन फ्लूबाधित आढळले आहेत. त्यामुळे सर्वतोपरी काळजी घेण्याचे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.
गेल्या तीन दिवसांमध्ये 166 संशयित रुग्ण आढळून आले. त्यापैकी 92 रुग्णांच्या घशातील नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 67 रुग्णांना लागण झाल्याचे निदान झाले आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यावर्षी स्वाईन फ्लूच्या संसर्गाचा वेग वाढत असल्याचे आढळून आले आहे. गुरुवारी (11 ऑगस्ट) एका पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाला.
महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार, 1 जानेवारी ते 11 ऑगस्ट या कालावधीत स्वाईन फ्लूचे 7 हजार 436 संशयित रुग्ण आढळून आले. त्यापैकी 3 हजार 691 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवून त्या सर्व रुग्णांना टॅमी फ्लू देण्यात आले. त्यापैकी 361 जण पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले आहे. ऑगस्ट महिन्यात स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. सध्या 406 संशयित रुग्ण शहरातील विविध रुग्णालयांमध्ये दाखल आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 179 रुग्ण उपचार घेत असून, 14 जण व्हेंटिलेटरवर आहेत.
दिनांकसंशयितनमुना तपासणीपॉझिटिव्ह
9 ऑगस्ट603125
10 ऑगस्ट512915
11 ऑगस्ट553227
(12 ऑगस्टची आकडेवारी रात्री उशिरापर्यंत उपलब्ध झाली नाही