स्वाभिमानीच्या उपसरपंचाकडे सापडले 75 लाख 

कोल्हापूर – “एक नोट एक वोट’ असं म्हणत न निवडणूक लढवणाऱ्यांचा बुरखा फाटला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्‍यात संभाजीपुर ग्रामपंचायतीचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपसरपंच बरकत गवंडी आणि त्यांचे भाऊ गणी गवंडी यांच्या दुकान आणि गोडाऊनवर निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने छापा टाकला दुकानात तब्बल 75 लाख रुपये भरारी पथकाला आढळून आले. ही रक्कम भरारी पथकाने आपल्या ताब्यात घेतली आहे. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत इतक्‍या मोठ्या प्रमाणावर ती रक्कम सापडल्याने या निवडणुकीत पैशाचा बाजार करण्याच्या हेतूनेच इतकी प्रचंड रक्कम आणण्यात आली असावी, असा अंदाज व्यक्त होत.

कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर शहरातील बाराव्या गल्लीत गवंडी टोबॅको या दुकानावरती आणि त्यांच्याच संभाजीपुर येथील गोडाऊनवरती निवडणूक आयोगाच्या भरारी पथकासह जयसिंगपूर पोलिसांच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी छापा टाकला. या छाप्यात 75 लाख रुपयांची रक्कम आढळून आले आहे.स्वाभिमानीचा उपसरपंच मोठ्या रकमेसह सापडल्याने स्वाभिमानी पक्षात एकच खळबळ उडाली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास आयकर विभाग आणि पोलिस करत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.