नवी दिल्ली – एका महिलेने स्वत:च्या पतीला डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून अनैतिक संबंध प्रस्थापित करताना पकडले. महिलेला पतीबाबत संशय आला आणि तिने पतीचे लोकेशन ट्रेस करण्यास सुरुवात केली. लोकेशन ट्रेस करत असताना तिने आपल्या पतीच्या मागे जाऊन त्याला हॉटेलमध्ये पकडले. इंदौरमध्ये हा खळबळजनक प्रकार घडला आहे.
नवरा हॉटेलच्या खोलीत एका तरुण मुलीसह होता. ही महिला हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर बराच गदारोळ झाला. या महिलेने त्या मुलीला आणि स्वत:च्या पतीला खूप शिवीगाळ करून मारहाण केली. यादरम्यान तरुणीने महिलेवर लोखंडी रॉडने वार केले. यानंतर घरगुती हिंसाचार कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला.
विजय नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रत्नलोक कॉलनीतील बी फाइन हॉटेलमध्ये ही घटना घडली. भोपाळमधील एका महिलेचे पाकीजा ग्रीन कॉलनीत राहणाऱ्या इंदूरमधील एका व्यक्तीशी लग्न झाले. लग्नानंतर पत्नीला पतीच्या हालचालींवर संशय येऊ लागला. नवरा अनेकदा एका मुलीशी फोनवर बोलत असे. यानंतर ही महिला त्याची हेरगिरी करू लागली आणि त्याच्या मोबाइलचे लोकेशन शोधू लागली.
काल तिने पतीचे मोबाइल लोकेशन तपासले असता तो बी फाइन हॉटेलमध्ये थांबल्याचे दिसून आले. मग सदर महिलाही त्याच हॉटेलमध्ये पोहोचली आणि जिथे तिचा पती एका मुलीसोबत होता. पत्नीने घटनास्थळी चांगलाच गोंधळ घातला आणि पतीसह मुलीला शिवीगाळ केली. संतापलेल्या तरुणीने महिलेवर रॉडने हल्ला केला. त्यानंतर महिलेने विजय नगर पोलीस ठाणे गाठले. येथे तिने आपल्या पतीच्या कारवायांची माहिती पोलिसांना दिली आणि पतीसह मुलीवर गुन्हा दाखल केला.