केडगाव- प्रोएक्टिव्ह ऍबेकस विभागीय स्पर्धेत केडगाव येथील सनराईज संगणक केंद्राची सुप्रिया अढागळे ही विद्यार्थिनी प्रथम आली आहे. ही स्पर्धा पुणे येथील अण्णा भाऊ साठे सभागृहात पार पडल्या. या स्पर्धेत पुणे जिल्ह्यासहित ठाणे, अहमदनगर, मुंबई, सोलापूर, सातारा इत्यादी ठिकाणांवरून 1500 विद्यार्थी सहभागी झाले होते.
केडगाव सनराईज संगणक केंद्राचे एकूण 62 विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते, त्यामध्ये सुप्रिया अढागळे हिने सहा मिनिटात 100 गणिते सोडवून विभागात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे. लहान गटात श्रेयस यशवंत इनामके हा विद्यार्थी प्रथम आला, तर पायल हेमंत केंजळे, अमृता विनोद नेवसे, कार्तिक तुकाराम शेलार, तनिश्का सचिन थोरात, सार्थक लिंबराज जाधव यांनी सुवर्ण पदक मिळवले. या सर्व विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षक बापू नवले, कल्पना नवले रिमा परभाणे, तनुजा बळी यांनी मार्गदर्शन केले.