मुंबई – अभिनेता सनी देओलचा चित्रपट गदर 2 कमाईच्या बाबतीत रोज नवनवे रेकॉर्ड बनवत आहे. आता सनी देओल त्याच्या चाहत्यांसाठी आणखी एक मोठे सरप्राईज घेऊन येत आहे. गदर 2 नंतर आता बॉर्डर 2 चित्रपट लवकरच प्रेक्षकांचा भेटीला येणार आहे. रिपोर्ट्सनुसार, सनीने जेपी दत्ताशी याबद्दल चर्चा सुरु आहे. आणि यावेळी जेपी दत्तासोबत त्याची मुलगी निधी दत्ता देखील या सीक्वलमध्ये सामील होणार आहे.
बॉर्डर हा सिनेमातील सर्वात ऐतिहासिक ब्लॉकबस्टर सिनेमा आहे. गेल्या 2 ते 3 वर्षांपासून बॉर्डरचा सिक्वेल बनवण्याबाबत टीम चर्चा करत आहे आणि आता या चित्रपटाची टीम बॉर्डर 2 ची अधिकृत घोषणा लवकरच करणार आहे. टीमने 1971 च्या भारत-पाक युद्धाची एक कथा ओळखली आहे, जी अद्याप मोठ्या पडद्यावर सांगितली गेली नाही, आणि ती एका नेत्रदीपक पद्धतीने जिवंत करण्यासाठी सज्ज आहे. फक्त सनी देओल त्याच्या भूमिकेत पुन्हा दिसणार आहे. एक भारी अॅक्शन चित्रपट असल्याने, टीम तरुण पिढीतील कलाकारांना कास्ट करेल. सनी देओल हा बहुधा बॉर्डरचा एकमेव अभिनेता असेल, जो बॉर्डर 2 चा देखील भाग असेल.
सध्या हे सर्व सुरुवातीच्या टप्प्यात आहे, आणि चित्रपटाची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार आहे. 1997 मध्ये रिलीज झालेला बॉर्डर हा 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धाची कथा आहे, जे जैसलमेरच्या लोंगेवाला पोस्टवर लढले गेले होते. मोठ्या शौर्याने भारताच्या केवळ 120 वीरांनी हजारो पाकिस्तानी सैनिकांचा धैर्याने सामना केला. या युद्धात भारताचा विजय झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 65.57 कोटींची कमाई केली.