पुणे(प्रतिनिधी) – शिक्षण क्षेत्रात नामांकित पुणे विद्यार्थी गृह संस्थेच्या कार्याध्यक्षपदी सुनील रेडेकर यांची निवड झाली आहे. कार्यवाहपदी प्रा. राजेंद्र कांबळे यांची फेरनिवड झाली आहे.
नुकत्याच झालेल्या कौन्सिल व संचालक मंडळाच्या सभेत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. उपकार्याध्यक्षपदी एस. एम. जिर्गे, कोषाध्यक्षपदी आनंद कुलकर्णी व कुलसचिवपदी अमोल जोशी यांची निवड झाली आहे.
यावेळी संचालक मंडळातील संजय गुंजाळ, रमेश कुलकर्णी, राजेंद्र बोऱ्हाडे, राजेंद्र कडुस्कर, कृष्णाजी कुलकर्णी उपस्थित होते.
यावेळी सुनील रेडेकर म्हणाले, 112 वर्षांची परंपरा असलेल्या संस्थेच्या कार्याध्यक्षपदाचा पदभार संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडून स्वीकारणे, हा आंनदी क्षण आहे. संस्थेचा विस्तार व नावलौकिक वाढविण्याचा मानस असून, संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात नवे अभ्यासक्रम सुरू करून रोजगाराभिमुख शिक्षणावर भर राहील.