लाखणगाव- काठापूर बुद्रुक येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने दिवाळीनिमित्त सवलतीच्या दरात साखर वाटप करण्यात आले, अशी माहिती भीमाशंकर कारखान्याचे संचालक बाळासाहेब घुले यांनी दिली. यावेळी उपसरपंच विनायक करंडे, कान्हु करंडे, बाबाजी करंडे उपस्थित होते. साखर वाटप धोरणानुसार ऊस उत्पादक व पूर्ण शेअर्स धारकाला 80 किलो, अपूर्ण शेअर्सधारक 50 किलो तर ऊस उत्पादकाला 60 किलो साखर वीस रुपये दराने देण्यात आली.