मुंबई – सुगंधा मिश्रा आणि संकेत भोसले या टीव्ही कलाकारांनी या महिन्यात लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. सुगंधाने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर संकेत बरोबरचे काही रोमॅण्टिक फोटो पोस्ट करून ही माहिती दिली आहे. हे दोघेजण 2017 पासून एकमेकांना डेट करत होते.
आता कुठे या दोघांनी आपल्या रिलेशनशीपला कन्फर्म केले आहे. 26 एप्रिलला हे दोघेजण लग्न करणार आहेत. जालंधरमध्ये होणारा हा विवाह समारंभ अगदी खासगी स्वरूपाचा असेल.
सध्याच्या परिस्थितीत अगदी घरातील निवडक लोकांच्या उपस्थितीत लग्न होईल, असे सुगंधाने म्हटले आहे. सुगंधा आणि संकेत दोघेही विनोदी कलाकार आहेत. हिंदीतील काही विनोदी मालिका आणि स्टेज शोमध्येही ते सहभागी झाले आहेत.