नवी दिल्ली : भारत आणि इस्राईल यांनी एकत्रितरित्या विकसित केलेल्या जमिनीवरुन हवेतील लक्ष्य भेदणाऱ्या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची नौदलाची नुकतीच यशस्वी चाचणी पार पाडण्यात आली. नौदलाच्या आयएनएस विशाखापट्टनम या युद्धनौकेवरुन ही रात्रीच्या सुमारास चाचणी घेण्यात आली. यावेळी हवेतील एका लक्ष्याचा भेद करत असल्याचा व्हिडीओ नौदलाने प्रसिद्ध केला आहे.
#IndianNavy successfully undertook MRSAM firing from #INSVisakhapatnam validating capability to engage Anti Ship Missiles.
MRSAM jointly developed by @DRDO_India & #IAI, & produced at #BDL reflects #IndianNavy‘s commitment to #AatmaNirbharBharat.@DefenceMinIndia @PMOIndia pic.twitter.com/I8LwCV2WWH— SpokespersonNavy (@indiannavy) March 7, 2023
जमिनीवरुन हवेतील लक्ष्य भेदणाऱ्या क्षेपणास्त्राला तांत्रिकदृष्ट्या MR-SAM म्हणजेच medium range mobile surface to air missile म्हटले जाते, नौदलाने विकसित केलेल्या या क्षेपणास्त्राचे नाव आहे Barak 8. नौदलाचे हे एक प्रमुख क्षेपणास्त्र असून यामुळे नौदलाच्या प्रहार क्षमतेत मोलाची भर पडली आहे.
७० किलोमीटर अंतरापर्यंत आणि १६ किलोमीटर उंचीपर्यंतचे कोणतेही लक्ष्य मग ते लढाऊ विमान, हेलिकॉप्टर, ड्रोन भेदण्याची क्षमता क्षेपणास्त्रामध्ये आहे. ध्वनीच्या दुप्पट वेगाने संचार करण्याची क्षमता असल्याने या क्षेपणास्त्राचा मारा चुकवणे अवघड समजले जाते.