पुणे -महाड येथे नुकत्याच पार पडलेल्या महिला गटाच्या 9 व्या ज्युनियर राज्य अजिंक्यपद मुष्टियुद्ध स्पर्धेत पुण्याच्या महिला संघाने विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत महिला संघाने निर्विवाद वर्चस्व राखताना 3 सुवर्ण, 4 रजत तर 1 ब्रॉंझ अशी एकूण 8 पदके पटकावली.
या स्पर्धेकरिताअमोल सोनवणे, यश खाणेकर यांनी पुणे शहर संघाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहिले. या सर्व खेळाडूंचा आणि प्रशिक्षकांचा सत्कार महाराष्ट्र मुष्टियुद्ध संघटनेचे उपाध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी यांच्याहस्ते करण्यात आला.
यावेळी पुणे शहर मुष्टियुद्ध संघटनेचे कार्याध्यक्ष व नगरसेवक अविनाश बागवे आणि पुणे शहर मुष्टियुद्ध संघटनेचे सचिव मदन वाणी व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक विजय गुजर उपस्थित होते.
पदक विजेते खेळाडू
1) सृष्टी चोरगे (32-34 कि.) सुवर्ण. 2) सायली जाधव (50-52 कि.) सुवर्ण. 3) रोज सय्यद (50-52 कि.) सुवर्ण. 4) कस्तुरी शिंदे (40-42 कि.) रजत. 5) भूमिका खिल्लारे (44-46 कि.) रजत. 6) सई धोडमिसे (57-60 कि.) रजत. 7) रिया कुठे (60-63 कि.) रजत. 8) सृष्टी जाधव (48-50 कि.) ब्रॉंझ.