नांदेड – गेल्या चार महिन्यांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप चालू आहे. मात्र अद्यापही यावर तोडगा निघाला नाही. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मुख्य मागणीवर एसटी कर्मचारी अद्यापही ठाम आहेत. चार महिन्यांपासून कर्मचाऱ्यांना पगारही नाही. त्यामुळे हे कर्मचारी मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. यातूनच नांदेडमध्ये एका कर्मचाऱ्याने आत्महत्या केली आहे. एसटीचे आंदोलन सुरू झाल्यापासून नांदेड जिल्ह्यातील हा तिसरा बळी आहे.
गंगाधर येवतीकर (वय 48) असे आत्महत्या करणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव असून नांदेड जिल्ह्यातील मुखेड आगारात ते चालक म्हणून कार्यरत होते. मुखेड शहरातील कंधार फाटा येथील राहत्या घरी त्यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.