मुंबई – मुंबईत एका एसआरपीएफ जवानाने स्वत:वरच गोळ्या झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यात तो गंभीर जखमी झाला असून त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दक्षिण मुंबईतील डोंगरी भागात हा प्रकार घडला. पुष्कर शिंदे असे या जवानाचे नाव आहे. शिंदे हा एसआरपीएफच्या पुण्यातील ग्रुप 2 चा जवान आहे. त्याला 6 जानेवारीपासून मंत्रालयात मुख्य गेटवर नियुक्ती देण्यात आली होती.
तो आज आपली ड्युटी संपवून महापालिका शाळेत आला. सध्या त्याच्या राहण्याची सोय तेथेच करण्यात आली आहे. शाळेच्या खोलीत तो एकटाच असताना त्याने स्वत:वर गोळी झाडून घेतली. त्याने मानेवरच गोळी झाडून घेतल्याने तो अत्यंत अत्यवस्थ आहे. त्याने हा प्रकार कोणत्या कारणाने केला हे मात्र अजून समजू शकलेले नाही.