पिंपरी – ‘पीसीएमसीज व्हेरॉक-वेंगसरकर केडमीतर्फे, थेरगाव येथे 19 वर्षांखालील मुलींच्या व्हेरॉक चषक 2023 क्रिकेट स्पर्धेमध्ये ‘स्कोअर स्पोर्टस् अचिव्हर्स’, ‘व्हेरॉक-वेंगसरकर’संघांनी साखळी फेरीत विजय मिळविले.
पहिल्या सामन्यात व्हेरॉक-वेंगसरकर क्रिकेट केडमी संघाने ओमसाई वुमेन्स केडमीवर तीन गडी राखून मात केली. गोलंदाज वैष्णवी म्हाळसकर सामन्याची मानकरी ठरली. दुसर्या सामन्यात ऑल स्टार्स क्रिकेट केडमीला स्कोअर स्पोर्टस अचिव्हर्स संघाने 10 गडी राखून पराभवाचा धक्का दिला. वेदिका दळवी सामन्याची मानकरी ठरली.
निकाल पुढीलप्रमाणे –
ओम साई वुमेन्स क्रिकेट अॅकेडमीने 25 षटकांत 5 बाद 74 धावा केल्या. यामध्ये- तन्वी पाटील नाबाद 18, भाविका अहिरे 14 (वैष्णवी म्हाळसकर 2/11) अशी खेळी केली. त्याला प्रत्युत्तर देताना व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अॅकेडमीने 22.5 षटकांत 7 बाद 75 धावा करत विजय मिळविला. स्वांजली सूर्यवंशी 12 (तन्वी पाटील 3/12, ज्ञानेश्वरी पाटील 2/8) खेळी केली.
दुसर्या सामन्यात ऑल स्टार्स क्रिकेट अॅकेडमीने 14.4 षटकांत सर्वबाद 42 धावा केल्या. यशस्वी वाघमारे 21 (विभावरी देवकाते 3/10, वेदिका दळवी 3/5) ची खेळी केली. त्या विरोधात स्कोअर स्पोर्टस अचिव्हर्सने 7 षटकांत बिनबाद 43 – सायली नाबाद 28, सानिका शिंदे नाबाद 8 खेळी करत सामना जिंकला.