IND vs SA Test Toss Update : अवघ्या 36 दिवसांपूर्वी एकदिवसीय विश्वकरंडकाच्या अंतिम सामन्यात झालेल्या पराभवाची निराशा विसरून रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आता दक्षिण आफ्रिकेत 31 वर्षांनंतर पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकूण ऐतिहासिक कामगिरी करण्यासाठी सज्ज झाला आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आजपासून सुरू होत आहे. सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट पार्कमध्ये दोन्ही संघ आमनेसामने आले आहेत.
सामन्याच्या पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रसिध्द कृष्णा याने भारतासाठी पदार्पण केले तर दक्षिण आफ्रिकेसाठी डेव्हिड बेडिंगहॅमने आणि नांद्रे बर्जर यांनी पदार्पण केले आहे.
IND vs SA Live Score : दोन्ही संघांचे Playing -11
दक्षिण आफ्रिका : डीन एल्गर, एडन मार्कराम, टोनी डी जोर्गी, टेम्बा बावुमा (कर्णधार), कीगन पीटरसन, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेयन (डब्ल्यू), मार्को जेनसेन, जेराल्ड कोएत्झी, कागिसो रबाडा, नांद्रे बर्गर.
🚨 Team News 🚨
Prasidh Krishna makes his Test debut.
A look at #TeamIndia‘s Playing XI 🔽
Follow the Match ▶️ https://t.co/Zyd5kIcYso
𝗨𝗣𝗗𝗔𝗧𝗘: Mr Ravindra Jadeja complained of upper back spasms on the morning of the match. He was not available for selection for the… pic.twitter.com/r7Tch9hueo
— BCCI (@BCCI) December 26, 2023
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा.
दरम्यान, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या बॉक्सिंग डे कसोटी मालिकेला मंगळवारपासून सुरुवात होणार आहे. 1992 पासून दक्षिण आफ्रिकेतील भारताची ही नववी कसोटी मालिका असेल, परंतु आतापर्यंत या देशात भारत एकही मालिका जिंकू शकलेला नाही. त्यामुळे नेहमीप्रमाणेच सध्याची मालिकाही रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघासाठी एक आव्हान असणार आहे.