पुनावळे, (वार्ताहर) – माय होम कॉर्पेरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये 60 किलोवॅटचा सोलर प्रकल्प कार्यान्वित झालेला आहे. ज्यामध्ये जवळपास साडेसात हजार युनिट प्रति महा उत्पन्न होईल. त्यामुळे सोसायटीचे चाळीस ते पन्नास टक्के वीज बिल बचत होईल.
सोसायटीला दीड ते पावणे दोन लाख रुपये दरमहा बिल येत आहे. पुढील काळात सोसायटी विज बिल हे मोठ्या प्रमाणात कमी होईल तसेच हा प्रकल्प आरे एजन्सीतर्फे इन्वेस्टमेंट करून सोसायटीला योग्य दरात वीज देण्यात येणार आहे.
हा करार सोसायटीने सोलर ऑपरेटिंग एजन्सी सोबत दहा वर्षासाठी केला आहे. या प्रकल्पासाठी लागणारा खर्च हा पूर्णपणे इन्वेस्टरतर्फे करण्यात आलेला आहे. तसेच सोसायटी मेंबर्सकडून कुठलाही अतिरिक्त अधिभार न लावता हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आलेला आहे.
या वेळी सोसायटी व्यवस्थापकीय समिती व सोसायटीमधील रहिवासी उपस्थित होते. समितीतर्फे मधुर तनेजा, अतुल माळोदे, नीरज पाटील, जयंत मोरे, रुपेश कोल्हे उपस्थित होते.