पुणे – बॉलीवूड अभिनेते अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन-नंदा ही रूपेरी पडद्यापासून लांब असली तरी सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. बॉलीवूडमधील आमिर खान आणि सलमान खान या दोन अभिनेत्यांची ती चाहती आहे.
याबाबत नुकतेच अभिषेक बच्चनने भाष्य केले आहे. याबाबत आमिर खानला जेव्हा कळले तेव्हा त्याने श्वेताला पत्र लिहिण्यास सुरुवात केल्याचे गौप्यस्फोटही अभिषेकने केला. करण जोहरच्या “कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये अभिषेकने बहीण श्वेताशी संबंधित अनेक गुजगोष्टी केल्या आहेत. सलमान खानचा “मैंने प्यार किया’ चित्रपट प्रदर्शित झाला होता तेव्हा श्वेता बोर्डिंग स्कूलमध्ये होती.
तिने हा चित्रपट व्हीसीआरवर पाहिला होता. तसेच तिने अभिषेक बच्चनकडून फ्रेंड लिहिलेली कॅप देखील मागितली होती. याचबरोबर आमिर खानची देखील चाहती असल्याचे त्याने या कार्यक्रमात सांगितले. अभिषेक म्हणाला, जेव्हा आमिर खानला याबाबत माहिती मिळाली तेव्हा त्याला आनंद झाला.
त्यानंतर तो श्वेताच्या प्रत्येक वाढदिवशी तिला पत्र लिहून पाठवायचा. आमिर खान आणि श्वेता बच्चन यांचा वाढदिवस लागोपाठ असल्याने तो मला पत्र लिहीत असावा हे देखील एक कारण असल्याचे त्याने यावेळी सांगितले.