शिक्रापूर – सणसवाडी (ता. शिरूर) येथे घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी घरावर डल्ला मारीत सुमारे दोन लाखांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
उत्तम धूळगंड (रा. सणसवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबतची माहिती अशी की, धूळगंड दाम्पत्य कामानिमित्त बाहेर गावी गेले होते त्यामुले त्यांचे घर बंद होते. हीच संधी साधून चोरट्यांनी त्यांचे घर फोडले. पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक किरण भालेकर व पोलीस नाईक तेजस रासकर हे करीत आहेत.
दरम्यान, शिक्रापूर पोलीस ठाणे हद्दीमध्ये अनेक ठिकाणी चोऱ्या होत आहेत. चोरट्यांनी कोरेगाव भीमा येथे पाच ते सहा ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या तर यावेळी सहा चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले. त्यांनतर दोनच दिवसांत पुन्हा सणसवाडी येथे चोरट्यांनी चार घरे फोडली आहे. त्यामुळे चोरट्यांचा बंदोबस्त करणे पोलिसांपुढे आव्हान निर्माण झाले आहे.