Singhania Family Dispute : रेमंडचे मालक गौतम सिंघानिया यांचे वडील विजयपत सिंघानिया यांनी आपल्या मुलाला सर्व संपत्ती देऊन चूक केल्याचे म्हटले आहे. आता त्यांनी पत्नी नवाज मोदी यांनाही घरातून हाकलून दिले आहे. त्यावर बोलताना विजयपत सिंघानिया यांनी,” मी माझ्या सुनेला साथ देईन असे ते म्हणाले. मात्र, मी माझ्या मुलाला चांगल्याप्रकारे ओळखतो, तो कोणत्याही परिस्थितीत नवाजला ७५ टक्के संपत्ती देणार नाही.” असेही ठामपणे म्हटले आहे.
एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत विजयपत सिंघानिया आणि गौतम सिंघानिया यांच्या नात्यातील कटुता स्पष्टपणे दिसून आली. आपल्या मुलासाठी कटू शब्द वापरत त्यांनी वडिलांना हाकलून दिल्याचे सांगितले. आता त्याने बायकोलाही हाकलून दिले. नवाज माझ्याकडे मदतीसाठी आला तर मी तिला पाठिंबा देईन. मी यापूर्वीही तिला सल्ला देण्याचा प्रयत्न केला होता. गौतम कधीही नवाजला ७५ टक्के वाटा देणार नाही. सर्व काही आणि प्रत्येकाला खरेदी करणे हे त्याचे लक्ष्य आहे” असे म्हणत त्यांनी आपल्या मुलावर टीका केली.
पुढे ते म्हणाले की, मी माझा मुलगा गौतम सिंघानियाला सर्वकाही दिले. पण, त्याने माझ्याकडून सर्व काही काढून घेतले. मला माझे आयुष्य कसे तरी जगायचे होते. माझा काही व्यवसायही नाही. त्यांनी मला कंपनीतील काही हिस्सा देण्याचे आश्वासन दिले. पण, नंतर माघार घेतली. गौतम हा अहंकारी माणूस आहे. तुमच्या मुलांसाठी तुम्ही जे काही करू शकता ते तुम्ही करू शकता, परंतु, सर्व मालमत्ता त्यांच्या ताब्यात देऊ नका. तुमच्या मृत्यूनंतर सर्व काही मुलांनाच मिळणार आहे,” असे म्हणत आपल्या मुलाचे कृत्य त्यांनी सांगितले.
रेमंड कंपनी अंदाजे 123 वर्षांपूर्वी सुरू झाली. 1900 मध्ये, वाडिया मिल या नावाने महाराष्ट्रातील ठाणे येथे वूलन मिल म्हणून कंपनीचा पाया घातला गेला. 2015 मध्ये विजयपत सिंघानिया यांनी त्यांचे सर्व शेअर्स आणि कंपनी त्यांचा मुलगा गौतम सिंघानियाला दिली. यानंतर पिता-पुत्राचे नाते बिघडू लागले. फ्लॅटबाबत दोघांमधील वाद इतका वाढला की मुलाने वडिलांना बेघर केले. त्यांना भाड्याच्या घरात शिफ्ट व्हावे लागले. इतकेच नव्हे तर नावासोबत अध्यक्ष-उमेद (निवृत्त अध्यक्ष) लिहिण्याचा अधिकारही काढून घेण्यात आला.