बॉलीवूडमधील आघाडीची गायिका श्रेया घोषालने चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रेयाने ही “गुडन्यूज’ चाहत्यांसोबत शेअर केली आहे. करोना काळात सध्या मनोरंजन विश्वातून अशाच खूप चांगल्या बातम्या आली होती. अनुष्का शर्मा, करिना कपूर, कपिल शर्मा आणि बऱ्याच टीव्ही सेलिब्रिटीनंतर श्रेया देखील आपल्या घरी आता “चिमुकल्या’ पाहुण्याचे स्वागत करणार आहे.
View this post on Instagram
श्रेयाने ट्विट करून लिहिले की, बेबी श्रेयादित्य येत आहे. ही बातमी तुमच्यासोबत शेअर करताना मला आणि शीलादित्यला खूप आनंद होत आहे. आयुष्यातील एक नवीन अध्याय सुरू झाल्यामुळे आपणा सर्वांच्या प्रेम आणि आशीर्वादांची आम्हाला गरज आहे.
लॉकडाऊनदरम्यान श्रेयाचे “आंगना मोरे’ हे गाणे प्रदर्शित झाले होते. श्रेयाने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, जेव्हा लॉकडाऊनदरम्यान ती खूप कंटाळली होती, तेव्हा तिला या गाण्याची कल्पना सुचली.
ती म्हणते की, हा वाईट काळ सगळ्यांसाठीच निराशाजनक होता. सगळेच यातून बाहेर पडण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत होते. मात्र, या वाईट काळातही आमच्यावर आशीर्वादाचा वर्षाव झाला, असे श्रेया म्हणाली. श्रेयाने 2015मध्ये शिलादित्य मुखोपाध्यायशी लग्न केले होते.