वाहन विक्रीत लक्षणीय वाढ

लॉकडाऊनचे खाचखळगे संपुष्टात

नवी दिल्ली – प्रवासी वाहन क्षेत्राची परिस्थिती पूर्ववत होत आल्याची खात्रीची लक्षणे दिसू लागली आहेत. डिसेंबर महिन्यात मारुती सुझुकी, टोयोटा किर्लोस्कर मोटर्स, ह्युंदाई या कंपन्याच्या वाहन विक्रीत वाढ ( vehicle sales ) नोंदली गेली.

मारुती सुझुकी इंडियाच्या विक्रीत 20 टक्‍क्‍यांनी वाढ होऊन या कंपनीने 1,60,226 वाहने विकली. कंपनीच्या देशांतर्गत विक्रीत 17.8 टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे. तर निर्यातीमध्ये 31.4 टक्के वाढ झाली.
टोयोटा किर्लोस्कर मोटर कंपनीच्या डिसेंबर मधील विक्रीत 14 टक्‍क्‍यांची वाढ झाली. या कंपनीने 7,487 वाहनांची विक्री केली. भविष्यातही वाहन विक्री वाढण्याची शक्‍यता कंपनीचे उपाध्यक्ष नवीन सोनि यांनी व्यक्त केली.

ह्युंदाई मोटर इंडिया कंपनीच्या डिसेंबरमधील विक्रीत 30 टक्‍क्‍यांची वाढ होऊन या कंपनीने 66,750 वाहनांची विक्री केली. या कंपनीची देशांतर्गत विक्री 24 टक्‍क्‍यांनी वाढली आहे तर निर्यात 33 टक्‍क्‍यांनी वाढली आहे.

एमजी मोटार कंपनीच्या विक्रीत 30 टक्‍क्‍यांची वाढ होऊन या कंपनीने 4010 वाहने विकली. एस्कॉर्ट ट्रॅक्‍टर कंपनीच्या विक्रीत 88 टक्‍क्‍यांची वाढ झाली. या कंपनीने डिसेंबर महिन्यात 7,733 ट्रॅक्‍टर विकली.

यामाहा या दुचाकी निर्मात्या कंपनीच्या विक्रीत डिसेंबर महिन्यात ते 30 टक्‍क्‍यांची वाढ होऊन या कंपनीने 39,224 वाहने विकली आहेत. डिसेंबर महिन्यात महिंद्रा कंपनीच्या विक्रीत मात्र 10 टक्‍क्‍यांची घट झाली आहे. या कंपनीने 35,187 वाहने विकली. मात्र कंपनी भविष्याबाबत आशावादी आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.