पुणे – मागील चार ते पाच दिवसांपासून ४३ ते ४४ अंशावर पोहचलेला उष्णतेचा पारा शनिवारी (दि. २५) झपाट्याने ४० अंशाच्या खाली आला. त्यामुळे दिवसभर उन्हाचा चटका काहीसा कमी झाला असला तरी उकाडा वाढलेला होता. ढगाळ वातावरणामुळे गेल्या २४ तासांत तीन ते चार अंशाने कमाल तापमानात घट झाली.
मागील तीन ते चार दिवसांपासून उष्णतेची लाट जाणवत होती. पारा ४४ अंशाच्या पुढे गेला होता. दरम्यान, गेल्या २४ तासांत उष्णतेच्या पारा झपाट्याने खाली येऊ लागला असून, शनिवारी कमाल तापमान ३९ अंशापर्यंत खाली आले होते. त्यामुळे दिवसभर उन्हाचा चटका कमी जाणवत होता.
ढगाळ वातावरण असल्यामुळे काहीसा उकाडाही जाणवत होता. दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवस शहरातील हवामान कोरडे राहील. दुपारनंतर आकाश ढगाळ तर काही भागात पावसाच्या हलक्या सरी पडतील, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.
प्रमुख भागातील कमाल तापमान
शिरूर – 39, इंदापूर – 38.5, मगरपट्टा – 36.9, वडगावशेरी – 36.7, कोरेगांव पार्क – 36.3, पाषाण – 36, शिवाजीनगर – 35.9, चिंचवड – 35.6, एनडीए – 35.5, हडपसर – 34.9, गिरीवन – 34.5, लोणावळा – 32.7, भोर – 30