Sidhu Moose Wala । दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याची 2022 साली गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्याच्या हत्येची सर्वत्र चर्चा झाली होती. सिद्धू मूसेवालाच्या गाण्याने अनेकांना वेड लावले होते. तरुण वर्गात त्याची प्रचंड क्रेझ होती. आजही त्याच्या गाण्याची लोकप्रियता अधिक आहे. ( Sidhu Moose Wala )
भर रस्त्यामध्ये सिद्धू मूसेवाला याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. यानंतर सिद्धू मूसेवाला याचे आई वडील पूर्णपणे तुटलेले दिसले. सिद्धू मूसेवाला हा आपल्या मागे कोट्यवधीची संपत्ती सोडून गेलाय. मात्र, आता नुकताच सिद्धू मूसेवालाच्या आईने चरण कौर यांनी मुलाला जन्म दिलाय. मूसेवालाचे वडील बलकौर सिंह यांनी स्वतः सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे.
मूसेवालाच्या चाहत्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. सिद्धू मूसेवालाचे वडील बलकौर सिंह यांनी आपल्या लहान मुलाचा फोटो शेअर करताना लिहिलं, “परमेश्वराने शुभदीपच्या लहान भावाला आमच्या मांडीवर ठेवले आहे. देवाच्या आशीर्वादाने बाळ आणि त्याच्या आईची तब्येत बरी आहे. सर्व हितचिंतकांच्या प्रेमाबद्दल मी कृतज्ञ आहे.”
View this post on Instagram
सिद्धू मुसेवालाचे वडील बलकौर सिंग यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये ते बाळाला मांडीवर घेऊन बसलेले दिसत आहेत. तसेच त्यांच्या जवळ सिद्धू मुसेवालाचा फोटो देखील ठेवलेला दिसत आहे. या फोटोमध्ये बलकौर सिंह यांच्यासमोर केक ठेवलेला दिसत आहे.
बलकौर सिंग यांनी शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अनेकांनी या पोस्टला कमेंट करुन बलकौर सिंग आणि चरण कौर यांना शुभेच्छा दिल्या. सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
दरम्यान, गायक आणि रॅपर सिद्धू मुसेवालानं पंजाबच नाही तर देशारात विशेष ओळख निर्माण केली. सिद्धुच्या जाण्यानं त्याच्या कुटूंबियांवर आणि चाहत्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला होता. आता सिद्धूच्या भावाच्या जन्मानंतर त्याच्या कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. ( Sidhu Moose Wala | Charan Kaur )