बॉलिवुड अभिनेत्री कियारा आडवाणी हिने नुकताच आपला वाढदिवस जल्लोषात साजरी केला. यावेळी कियारासोबत सिद्धार्थ मल्होत्राही होता. गेल्या काही महिन्यांपासून या दोघांमध्ये अफेयर असल्याची चर्चा आहे. त्यातच सिद्धार्थने असे उत्तर दिले आहे की, त्यांच्यात अफेयर असल्याचे स्पष्ट होते.
सिद्धार्थने आपल्या रिलेशनशिपबाबत चुप्पी साधली असली तरी तो म्हणाला, कियारा ही त्या अभिनेत्रींपैकी एक आहे ज्याच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा हुक-अप ठेवू इच्छितो. एका चॅट शोमध्ये सिद्धार्थला विचारण्यात आले होते की, तु कोणासोबत अफेयर करू इच्छितो? यावर त्याने उत्तर दिले की, मी कियारा, जॅकलीन फर्नांडिस आणि तारा सुतारियासोबत अफेयर करु इच्छितो.
कियारा आडवाणी सतत तिच्या हॉट आणि सेक्सी फोटोज्मुळे सोशल मीडियावर प्रसिद्धीच्या छोतात असते. तिने 2014मध्ये “फगली’ चित्रपटातून बॉलिवुडमध्ये डेब्यू केले होते. त्यानंतर ती “एम. एस. धोनी ः द अनटोल्ड स्टोरी’मध्ये झळकली होती. या चित्रपटातील तिचा अभिनय आणि लुकमुळे तिची सर्वांनी स्तुती केली होती. दुसरीकडे सिद्धार्थ सध्या आपल्या आगामी “जबरिया जोडी’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यात त्याच्यासोबत परिणीती चोप्रा काम करत आहे. याशिवाय सिद्धार्थ “शेरशाह’मध्ये कियारासोबत आणि “मरजावा’मध्ये तारा सुतारियासोबत झळकणार आहे.