आळंदी – करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली परिस्थिती व त्या परिस्थितीमध्ये कोविड सेंटर मध्ये असलेला सुविधामध्ये विशेष विद्यार्थी कक्ष स्थापन करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा या गोष्टी विचारात घेता व सामाजिक बांधिलकी जोपासत भविष्यात उद्भवणाऱ्या कोरोना वा डेल्टा प्लस चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोविड सेंटर अद्ययावत करण्याकरता खेड तालुका मुख्याध्यापक संघाच्या वतीने शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचेकडून मदत जमा करण्यात आली.
श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेत फक्त विद्यार्थीच घडवला जात नाही तर सामाजिक बांधिलकीही जपली जाते. यामध्ये अनाथाश्रम, वृध्दाश्रम, आदिवासी, ठाकर वस्ती, नैसर्गिक आपत्ती तसेच कोविड 19 च्या जागतिक संकटामध्ये मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींना ज्यांच्या त्यांच्या धर्मानुसार त्यांचेवर अंतिम संस्कार करण्याचे पवित्र काम करणाऱ्या ‘मूळ निवासी मुस्लिम मंच’ त्याअंतर्गत आतापर्यंत जवळपास 700 पेक्षा अधिक मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यात आले अशा सामाजिक संस्था. अशा अनेक ठिकाणी धान्य, कपडे, जीवनावश्यक वस्तू, रोख रक्कम स्वरूपात मदत केली जाते.
याचाच एक भाग म्हणून कोरोना संकटाच्या पहिल्या टप्प्यात श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेने 156 दिवस आजूबाजूच्या परिसरात अन्नदान केले. हिच परंपरा कायम ठेवत व सध्याची परिस्थिती याचे भान ठेवून श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनियर कॉलेज मधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून स्वच्छेने 23 हजार रुपये रोख रक्कम मदत म्हणून खेड तालुका मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष सांडभोर सर यांचे प्रतिनिधी गव्हाणे सर यांचेकडे सुपूर्द करण्यात आली.
यामध्येही मदतीचा सहभाग घेत संस्थेच्या वतीने सचिव अजित वडगावकर यांनी एक हजार रुपयाची मदत केली. याप्रसंगी संस्थेचे सचिव अजित वडगावकर, विद्यालयाचे प्राचार्य दिपक मुंगसे, पर्यवेक्षक सूर्यकांत मुंगसे, किसन राठोड, प्रशांत सोनवणे, शिक्षकेतर प्रतिनिधी पूजा भोसले, शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार विकास शिवले यांनी व्यक्त केले.