- 392 नवीन रुग्णांची नोंद
- 415 जणांना डिस्चार्ज
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज पुन्हा करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. आज दिवसभरामध्ये शहरात 392 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर 415 करोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत.
महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, शनिवारी (दि. 3) शहरात 392 जणांना करोनाची लागण झाली. आजपर्यंत शहरातील 2 लाख 58 हजार 734 जणांना करोनाची लागण झाली आहे. आज दिवसभरात 3 करोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. तर गेल्या 24 तासात शहरात दोन बाधितांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत शहरातील 4292 करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
दिवसभरामध्ये 415 रुग्ण बरे झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 2 लाख 53 हजार 147 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 6097 संशयित रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयामध्ये तपासणीसाठी दाखल केले आहे. सद्यस्थितीत शहरातील महापालिकेची रुग्णालये व कोविड केअर सेंटरमध्ये 991 रुग्ण उपचार घेत आहेत. तर गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या 304 इतकी आहे. दोन्ही मिळून उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या 1295 इतकी आहे.