नवी मुंबई – महसूल गुप्तचर विभागाने आज उरण येथील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टमध्ये कारवाई करून तिनशे कोटी रूपयांचे 290 किलो हेरॉईन जप्त करण्याची मोठी कामगिरी केली आहे.
यंदाच्या वर्षी पकडण्यात आलेला हा मादक द्रव्यांचा सर्वात मोठा साठा आहे. हा साठा नेमका कोठून आला आणि त्यात कोण सहभागी आहे ही माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. तथापि या प्रकरणात दोन जणांची चौकशी केली जात आहे, असे सांगण्यात येते.
मागच्या वर्षी करण्यात आलेल्या अशा प्रकारच्या कारवाईत 191 किलो हेरॉईनचा साठा जप्त करण्यात आला होता. पंजाब पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने ही कारवाई केली होती. त्यापेक्षा आज सापडलेला साठा मोठा आहे.