आळंदी – शिवशंभू ऐतिहासिक लेखी परीक्षा 2021 पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पावन नगरीत श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनियर कॉलेज आळंदी देवाची याठिकाणी संपन्न झाली. स्वराज्य प्रतिष्ठान हिंदुस्थान संचलित आळंदी रायगड पालखी सोहळा समिती द्वारे या परीक्षेचे आयोजन केले गेले. छत्रपती श्री शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या अभ्यासक्रमावरील 200 गुणांसाठी ही परीक्षा यशस्वीरित्या पार पडली. महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातील 140 परीक्षा केंद्रांवर संपूर्ण महाराष्ट्रात ही परीक्षा एकाच वेळेस संपन्न झाली.
संपूर्ण महाराष्ट्रातून एकूण साडेचार हजार विद्यार्थी या परीक्षेसाठी बसलेले होते. पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे श्री ज्ञानेशवर विद्यालय व जुनिअर कॉलेज या ठिकाणी ही परीक्षा पार पडली. या ठिकाणी जवळपास दीडशे विद्यार्थी परीक्षेसाठी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांचे पालकही उपस्थित होते. महाराष्ट्रातील सर्वच विद्यार्थी परीक्षेसाठी केंद्रांवर सांस्कृतिक पोशाखात हजर होते. प्रत्येकाच्या डोक्यावर फेटा व वारकरी टोपी असा पेहरावा होता.
आळंदी येथे संत ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज या ठिकाणी संस्थेचे सचिव अजितशेठ वडगावकर यांनी सर्व शिवभक्तांचे व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. आशीर्वाद रुपी काव्यपुष्पातून शिवशंभू च्या विचारांची समाजाला गरज आहे. अनेक सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी साऱ्या महाराष्ट्रात ही परीक्षा होणे फार गरजेचे आहे. श्री ज्ञानेश्वर विद्यालय व जुनिअर कॉलेज सदैव आपल्या सोबत असेल, असे त्यांनी यावेळी सांगितले. परिक्षार्थी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
यानंतर समितीचे प्रमुख शिवशाहीर आकाश दादा भोंडवे यांनी सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले. यावेळी शाळेचे प्राचार्य मुंगसे सर, चव्हाण सर, घुंडरे सर व समितीचे पुणे जिल्हा प्रमुख राहुल दादा बांदलकर, स्मिताताई शिवले, निलेश महाराज चव्हाण, देविदास महाराज बर्डे, राज तपसे, दिनेश ढगे, अजित बामदाळे, सुरज करांडे, सुरज काकडे, दत्तात्रय वाघ, प्रवीण काकडे यांनी पर्यवेक्षकांची भूमिका यशस्वी रित्या पार पाडली, यावेळी सर्व विद्यार्थ्यांना दुपार सत्रात नाष्ट्याची व्यवस्था सुरज काकडे यांनी केली.