मुंबई – देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रमधून तिकडे गेले आहेत, ते गेल्यावर भाजपा तिथे फुटला. काल एक मंत्री मायकल लोबो यांनी पक्षाचा त्याग केला. भाजपाचे आमदारही पक्ष सोडून गेले. तेव्हा त्यांनी आधी पक्षांतर्गत युद्ध सुरू आहे ते बघावे. शिवसेना भाजपच्या नोटांना पुरून उरेल, गोव्यात आमची लढाई नोटांशीच आहे असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांच्या टीकेला उत्तर दिलं.
दरम्यान, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणीस यांनी टीका केली होती की,’महाराष्ट्रात ज्याप्रकारे तीन पक्षांनी जनमताची चोरी केली, ती आम्ही गोव्यात होऊ देणार नाही असं फडणवीस म्हणाले होते. ते पुढे म्हणाले की,’तसेच शिवसेनेने आपलं डिपॉझिट जप्त होऊ नये याकडे लक्ष द्यावं असा टोलाही त्यांनी लगावला आहे. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांच्या टीकेला उत्तर दिलं असून शिवसेना भाजपाच्या नोटांना पुरून उरेल असा विश्वास व्यक्त केला आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.