मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही अनेकदा तिच्या चित्रपटांमुळे तर कधी तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असल्याचे पाहायला मिळत होते. नुकतंच शिल्पा शेट्टीने तिच्या आगामी वेब सीरिजच्या शूटींगला सुरुवात केली आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टी या सीरिजच्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल प्लाटफॉर्मवर पदार्पण करत आहे. विशेष म्हणजे तिने तिच्या आगामी वेब सीरिजचे पोस्टरही सोशल मीडियावर शेअर केले आहे.
View this post on Instagram
‘इंडियन पुलिस फोर्स’ असे शिल्पा शेट्टीच्या आगामी वेब सीरीजचे नाव आहे. नुकतंच शिल्पा शेट्टीने या सेबी सीरिजचे पोस्टर इन्स्टाग्रामवर दमदार पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरवर शिल्पा शेट्टीचा कडक लुक पाहायला मिळत आहे. यात शिल्पा शेट्टीने घातलेल्या टी शर्टवर पोलीस असे नाव दिसून येत आहे.
View this post on Instagram
शिल्पा शेट्टीने इंस्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओही शेअर केला आहे. तिने या व्हिडिओमला कॅप्शन दिले आहे की,’Ready. Shetty. Go.’ व्हिडिओमधील शिल्पाची किलर स्टाईल तिच्या चाहत्यांना खूप आवडली आहे .
View this post on Instagram
ही आगामी वेब सीरिज ‘इंडियन पुलिस फोर्स’ पोलिसांवर आधारित असणार आहे. या सीरीजमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा आणि शिल्पा शेट्टी झळकणार असून ही ८ भागांची सीरिज अॅमेझॉन प्राइमवर रिलीज होणार आहे.