शेअर बाजारातील निर्देशांक स्थिर

मुंबई – अर्थसंकल्पानंतर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 1,500 अंकांनी कमी झालेला आहे. त्यामुळे आता विक्री थांबून खरेदी वाढेल, असे समजले जात असले तरी कंपन्यांची एकूण परिस्थिती पाहता निर्देशांकात आणखी घट होण्याची शक्‍यता काही ब्रोकर्सनी व्यक्त केली आहे.

मंगळवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 10 अंकांनी वाढून 38,730 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 2 अंकांनी कमी होऊन 11,555 अंकांवर बंद झाला. टिसीएस व एचडीएफसीचे शेअर मात्र घसरले.

Leave A Reply

Your email address will not be published.