डॉइचे बॅंकेची कर्मचारी कपात 18000 कर्मचाऱ्यांची नौकरी गेली 

न्यूयॉर्क – सोमवारचा दिवस हा डॉइचे बॅंकच्या अनेक कर्मचाऱ्यांच्या नौकरीचा शेवटचा दिवस होता. जर्मनीच्या या बॅंकेने कंपनीच्या पुनर्रचनेची घोषणा केली आणि काही तासांतच कंपनीच्या एचआरने कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले. येत्या काही काळात डॉइचे बॅंकेच्या एकूण 18 हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार आहेत.

बॅंक आपल्या ट्रेंडिंग उद्योगाचा मोठा भाग बंद करणार आहे. रविवारी कंपनीने तशी घोषणा केली. त्यानुसार, सिडनी आणि हॉंगकॉंगमधील कंपनीच्या इक्विटी डिव्हिजनमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सर्वात आधी निरोप दिला जाणार आहे. अनेक कर्मचाऱ्यांना तशी पत्रेही दिली आहेत. हॉंगकॉंगसारखीच परिस्थिती नंतर लंडन आणि न्यूयॉर्कमधील बॅंकेच्या कार्यालयांमध्ये दिसणार आहे.

बेंगळुरूमधील डॉइचे बॅंकेच्या एका कर्मचाऱ्याने सांगितले की त्याला आणि त्याच्या अनेक सहकाऱ्यांना सांगितले आहे की त्यांची नौकरी जाणार आहे. एका महिन्याच्या पगारासह एक रिलिव्ह लेटरही दिले जात आहे. कर्मचाऱ्यांमध्ये यामुळे तणावाचे आणि निराशेचे वातावरण तयार झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.