Shahid Kapoor: अभिनेता शाहिद कपूरने ‘जब वी मेट’ ‘कबीरसिंह’, ‘पद्मावत’ यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. सध्या ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ या चित्रपटामुळे तो चर्चेत आहे. या सगळ्यामध्ये शाहिद कपूर एका सुपर बिग बजेट चित्रपटाने प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. लवकरच शाहिद एका ऐतिहासिक भूमिकेत झळकणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमात शाहिद मुख्यभूमिकेत दिसणार आहे.
पिंकविलाने दिलेल्या वृत्तानुसार, शाहिद कपूर OMG 2 दिग्दर्शक अमित राय यांच्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपटाबाबत चर्चा सुरू आहे. हा चित्रपट अश्विन वर्दे निर्मित करणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमासाठी शाहिद कपूरने होकार दिला आहे. लवकरच या सिनेमाची घोषणा होऊ शकते. छत्रपती शिवाजी महाराज यांचं शौर्य आणि पराक्रमाची या सिनेमाच्या माध्यमातून उलगडणार आहे.
पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार, भारतीय सिनेसृष्टीतील हा आतापर्यंतचा सर्वात महागडा सिनेमा असणार आहे. अद्याप या सिनेमाचं नाव समोर आले नाही. मात्र सिनेप्रेक्षकांना आता या सिनेमाची प्रतीक्षा लागली आहे. तसेच शाहिद छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्यास यशस्वी होईल हे पाहावे लागणार आहे.