BOLLYWOOD : बॉलीवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) ‘पठाण’ आणि ‘जवान’ चित्रपट सुपरहिट ठरला. या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. या चित्रपटानंतर आता शाहरुखच्या आगामी ‘डंकी’ चित्रपटाची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. मात्र येत्या 2 नोव्हेंबर रोजी शाहरुखचा 58 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त चाहत्यांना तो मोठे गिफ्ट देणार आहे.
शाहरुखच्या डंकी या आगामी चित्रपटाचा टीझर त्याच्या वाढदिवसादिवशी म्हणजेच 2 नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहे. शाहरुख खान स्वत: डंकीचा टीझर लॉन्च इव्हेंट होस्ट करणार असल्याचे म्हंटले जात आहे. डंकी चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार हिरानी हे देखील किंग खानच्या चाहत्यांना ही खास भेट देणार आहेत. त्यामुळे चाहते देखील आनंदी झाले आहे.
दरम्यान, येत्या 22 डिसेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात तापसी पन्नू, बोमन ईरानी, दिया मिर्झा मुख्य भूमिकेत असणार आहे.या चित्रपटात विकी कौशल कॅमिओ भूमिका साकारताना दिसणार असल्याचे म्हटलं जात आहे. मात्र याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. ‘डंकी’मधून शाहरुखने पहिल्यांदाच राजकुमार हिरानींसोबत काम केलं आहे.
शाहरुखच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना आणखी एक गिफ्ट मिळणार आहे. शाहरुखचा जवान हा चित्रपट 2 नोव्हेंबर रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.