पुणे: कोंढवा पोलीस ठाणे व वाहतूक शाखा यांच्या वतीने खडी मशीन चौक येथे पुणे पोलीस आयुक्त ,उपआयुक्त तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त, कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, कोंढवा पोलीस ठाण्याचे ( गुन्हे) पोलीस निरीक्षक महादेव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली संचार बंदीच्या कालावधीमध्ये नाकाबंदी दरम्यान विना पास फिरणाऱ्या ७ चार चाकी वाहनावर कारवाई करण्यात आल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक दादाराजे पवार यांनी दिली आहे.
सध्या महाराष्ट्रात लॉक डाऊन चा कालावधी असून या कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता संचा रास मनाई करण्यात आलेली असताना देखील दुचाकी-चारचाकी वरून नागरिक विनाकारण हिंडताना दिसून येत असल्याने पोलिसांकडून होत असलेल्या कारवाईची मात्र सर्वत्र कौतुक होत आहे.