जयपूर – ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत एस. एन. सुब्बाराव यांचे आज येथील सरकारी रुग्णालयात निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. त्यांचा मृतदेह बापू नगरातील विनोबा ग्यान मंदिरात दर्शनासाठी ठेवण्यात आला होता.
तेथे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गोविंद दोस्तरा यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेऊन त्यांना आदरांजली वाहिली. सुब्बाराव हे देशाच्या विविध भागात युवकांसाठी शिबिरे आयोजित करून त्यांच्यात गांधीवादी विचार रूजवण्याचे काम करीत असत. त्यांच्या अशा शिबिरांपैकी अनेक शिबिरांत मुख्यमंत्री गेहलोत सहभागी झाले आहेत.
आपण वयाच्या दहाव्या- बाराव्या वर्षापासूनच सुब्बाराव यांच्या संपर्कात आलो आहोत आणि त्यांच्या शिबिरात सहभागी झालो आहोत, असे गहलोत यांनी म्हटले आहे. सुब्बाराव हे सातत्याने राजस्थानात या कार्यानिमित्त येत असत. राज्यपाल कालराज मिश्रा यांनीही त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.