कोलकाता – “मिस शेफाली’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ नर्तकी, अभिनेत्री आरती दास यांचे निधन झाले आहे. वयाच्या 76व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला आहे. पश्चिम बंगालमधील 24 परगना जिल्ह्यातील सोदेपुर येथील राहत्या घरात त्यांचे निधन झाले आहे. आरती दास या तीन बहिणींमधील सर्वात लहान.
आरती यांनी 60 ते 70च्या दशकात आपल्या नृत्य कौशल्याने लोकप्रियता मिळवली होती. त्यांनी 1968 रोजी प्रदर्शित झालेल्या “चौरंगी’ या चित्रपटातून कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीमधील दिग्गज दिग्दर्शक सत्यजीत रे यांच्यासोबत “प्रतिद्वंदी’ आणि “सीमाबद्ध’ या चित्रपटांमध्ये काम केले.
या चित्रपटांतील नृत्य आणि अभिनयाने आरती यांना लोकप्रियता मिळाली होती. दरम्यान, आरती दास यांच्या निधनावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दु:ख व्यक्त केले आहे.