Sonakshi Sinha Wedding Update| अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या ‘हिरामंडी’ वेबसिरिजला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. यातील सोनाक्षीच्या अभिनयाचे आणि सौंदर्याचे अनेकांनी कौतुक केले. या वेबसिरिजला मिळालेल्या यशानंतर सोनाक्षी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.
सोनाक्षी सिन्हा तिचा बॉयफ्रेंड आणि अभिनेता झहीर इक्बालशी २३ जून रोजी मुंबईत लग्न करणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. या लग्नात त्यांचे जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित असणार आहे. याशिवाय हिरामंडीची संपूर्ण टीम या लग्नाला हजेरी लावणार आहे. या दोघांच्या लग्नाचा सोहळा मुंबईतील बास्टियन येथे होणार आहे, अशी माहितीही समोर आली आहे.
मात्र, अद्याप दोघांकडून याबाबत कोणतेही अपडेट आलेले नाही. सोनाक्षी आणि झहीर बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. मागील काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाच्या चर्चा देखील सुरू झाल्या होत्या. झहीरने सोनाक्षीला तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारी एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये त्याने काही रोमँटिक फोटो शेअर केले होते. Sonakshi Sinha Wedding Update|
View this post on Instagram
अभिनेता सलमान खानने आयोजित केलेल्या पार्टीत सोनाक्षी आणि जहीरची पहिली भेट झाली. त्यांच्यात चांगली मैत्री झाली. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. सोनाक्षी आणि जहीरने ‘डबल XL’ चित्रपटात एकत्र काम केलं आहे. दोघांनी एकमेकांसोबतचे अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर केलेले आहेत.
दरम्यान, सोनाक्षीने सलमान खान सोबत ‘दबंग’ चित्रपटातून अभिनयाला सुरूवात केली होती. सोनाक्षी नुकतीच संजय लीला भन्साळी यांच्या ‘हीरामंडी’ या सीरिजमध्ये भूमिकेत झळकली होती. सोनाक्षीची भूमिका चाहत्यांच्या पसंतीस उतरली. Sonakshi Sinha Wedding Update|
हेही वाचा:
एनडीए सरकारची आज पहिली मंत्रिमंडळ बैठक ; कोणत्या विषयावर होणार चर्चा ? वाचा