पिंपरी -सुरुवातीला महिलेचा चेहरा असलेला आणि त्यानंतर मायलेकाचा चेहरा असलेले अश्लील फोटो पाठवून महिलेचा विनयभंग केला. ही घटना चक्रपाणी वसाहत, भोसरी येथे बुधवारी (दि. 19) दुपारी घडली.
पीडित महिलेने बुधवारी (दि. 19) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी 7061836569 आणि 9341756515 या मोबाइलवरील अज्ञात व्यक्तीच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. बुधवारी दुपारी फिर्यादी महिलेला आरोपीने फिर्यादी यांच्या मोबाइलवर व्हाट्सअप कॉल केला. त्यानंतर आरोपीने फिर्यादी यांचा चेहरा असलेले अश्लील फोटो व त्यानंतर दुसऱ्या मोबाइल क्रमांकावरून फिर्यादी व त्यांच्या मुलाचा चेहरा असलेले अश्लील फोटो पाठविला.