धक्कादायक ! वाढदिवसाच्या दिवशीच शाळकरी मुलीची आत्महत्या; पुणे जिल्ह्यातील घटना

पुरंदर – वाढदिवसाच्या दिवशीच 13 वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिवानी जालिंदर लिंभोरे (वय-13, शिवरी, ता. पुरंदर) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. 6) घडली. याप्रकरणी जेजुरी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जालिंदर सर्जेराव लिंभोरे शेतातून काम करून घरी आले असता त्यांना शिवानीने घरात अॅंगलला साडीने गळफास घेतलेला दिसला. त्यानंतर त्यांनी भाऊ आणि इतर लोकांच्या मदतीने तिला खाली उतरवून उपचारासाठी डाॅक्टरकडे नेले. मात्र, डाॅक्टरांनी तपासून तिला मयत घोषीत केले. याप्रकरणी पुढील तपास जेजुरी पोलीस करत आहेत.

शिवानी ही इयत्ता सातवीच्या वर्गात शिकत होती. शनिवारी तिचा वाढदिवस होता व याच दिवशी ही घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.