फक्त ‘या’ क्रमांकावर द्या ‘मिसकॉल’; …SBI देईल सर्वात स्वस्त ‘लोन’, मिळणार भरपूर फायदे

SBI Loan Service – जर आपण भारतातील सर्वात मोठी सरकारी बॅंक SBI चे ग्राहक असाल, तर आता तुम्हाला लोन मिळवण्यासाठी बॅंकेकडे जास्त चकरा मारण्याची गरज नाही. कारण या बॅंकने ग्राहकांसाठी एक खास सुविधा आणली केली आहे. ज्यामुळे ग्राहकांना बॅंकेच्या किचकट प्रोसेसिंगचा सामना करण्याची आवश्यकता नाही.

फक्त एक मिस काॅल दिल्याने आपल्याला लोनची सुविधा उपलब्ध होणार आहे. याबाबतची माहिती SBI ने आपल्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरुन ट्विट करुन  दिली.  त्यामुळे आता तुम्हाला कोणतेही तारण  न ठेवता लोन मिळवता येणार आहे. चला तर मग जाणून घेवूया लोन कसे घ्यायचे.

SBI ने केले ट्विट
SBI ने आपल्या  अधिकृत ट्विटर हॅंडल ट्विट करताना लिहले आहे की, आता पर्सनल लोन घेणे अजून ही सोईस्कर झाले आहे. तुम्हाला फक्त 7208933142 या नंबरवर मिस कॉल द्यायचा आहे आणि पुन्हा बॅंकेकडून तुम्हाला बॅंक कॉल येईल.

पर्सनल लोनची वैशिष्ट्ये
-लोनचे व्याज दर 9.60% आहे.
-तुम्ही 20 लाख रुपये पर्यंतचे लोन घेवू शकता.
-कमी व्याजदर.कमीत कमी कागदपत्रांची आवश्यकता.
-प्रक्रिया शुल्क कमी
-झिरो हिडन कॉस्ट
-तारण नाही

– या क्रमांकावर ही करु शकता कॉल
लोन संबंधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी या टोल फ्री 1800-11-2211 क्रमांकावर कॉल करु शकता. या व्यतिरिक्त 7208933142 या क्रमांकावर कॉल करुन माहिती घेवू शकता. जर तुम्हाला संदेशच्या माध्यमातून माहिती जाणून घ्यायची असेल, तर तुम्हाला  “PERSONAL” हा संदेश लिहावा लागेल आणि  या क्रमांकावर 7208933145 पाठवावा लागेल.

अधिकृत लिंकवरुन जाणून घेवू शकता –
अधिकच्या माहितीसाठी SBI बॅंकेच्या साइटवर किंवा या लिंकवर  https://bank.sbi/web/personal-banking/loans/personal-loans/xpress-credit-personal-loan  भेट देवू शकता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.