सातारा – राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागल्याने, शिवसेना सातारा शहरप्रमुख नीलेश मोरे आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या जिल्हा कार्यालयाबाहेर फटाके फोडून जल्लोष केला. ‘छत्रपती शिवाजी महाराजकी जय’, ‘एकनाथ शिंदे यांचा विजय असो’, ‘शिवसेनेचा विजय असो, अशा घोषणा देण्यात आल्या.
शिवसेना उपशहरप्रमुख अमोल खुडे, विक्रम यादव, संघटक शुभम भिसे, अमोल इंगोले, किरण कांबळे, ओंकार बर्गे, सयाजी शिंदे, सिद्धेश जाधव, मनोज भोसले, यश खत्री, एझाज काझी, हृषीकेश शिवडावकर, आदित्य यादव, प्रथमेश बाबर, मनीष मेथा, शुभम मेणकुदळे, ओंकार गायकवाड, अनिकेत भिसे, गणेश शिखरे, साईराज इथापे उपस्थित होते.