सातारा – येथील शाहूपुरी परिसरातील गेंडामाळ श्री दत्त सेवा मंडळ सातारा यांचे वतीने गेंडामाळ श्री दत्त देवस्थान मंदिरात दोन दिवशीय श्री दत्त जयंती उत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .
यामध्ये दत्त मंदिरात सोमवार दि. 25 डिसेंबर रोजी सकाळी आठ ते बारा या वेळेत श्री दत्तयाग संपन्न होणार असून दुपारी तीन ते चार या वेळेत मार्तंड महिला भजनी मंडळ, शाहूपुरी यांचे सांप्रदायिक भजन होणार आहे .त्यानंतर सायंकाळी पाच ते सहा या वेळेत ओंकार भजनी मंडळ, शाहूपुरी यांचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे .
मंगळवार दि. 26 डिसेंबर रोजी सकाळी आठ ते साडेदहा या वेळेत दत्त जयंती निमित्त मार्गशीर्ष पौर्णिमेस श्रींची षोडशोपचार पूजा होऊन अभिषेक नैवेद्य व आरती होणार आहे. त्यानंतर दुपारी तीन ते चार या वेळेत रामकृष्ण पाठ मंडळ शाहूपुरी यांचे वेदमंत्र ,स्तोत्रपठण होणार आहे .सायंकाळी पाच वाजता शाहूपुरी येथील सौ .मंजुषा बाजी यांचे कीर्तन व जन्मकाळ संपन्न होऊन त्यानंतर सुंठवडा व प्रसाद वितरण, आरती असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे .अशी माहिती दत्त सेवा मंडळ गेंडामाळ विश्वस्त समितीच्या वतीने दिले आहे.