राजूर – मराठी पत्रकार परिषदेच्या 85 व्या वर्धापनदिना निमित्ताने परिषदेच्या तालुका शाखेच्या वतीने संगमनेर येथील मेडिकव्हर हॉस्पिटलच्या सहकार्याने सर्व पत्रकार व कुटुंबियांचे मोफत आरोग्य तपासणी शिबीर शुक्रवार दि.15 डिसेंबर रोजी अकोले येथील सर्वोदय छात्र निवास येथे सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आले आहे.
गतवर्षी संगमनेर येथे मेडिकव्हर हॉस्पिटल येथे तालुक्यातील पत्रकारांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली होती. यावर्षी अकोले येथील सर्वोदय वसतिगृह येथे पत्रकारांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. या शिबिरात ब्लड प्रेशर, शुगर, वजन, एसपी, ओटू, इसीजी तपासणी होणार आहेत.
आवश्यकता असल्यास संबधिताची 2 डी इको, कॉलेस्ट्रॉल तपासण्या सवलतीच्या दरात मेडिकव्हर हॉस्पिटल येथे केल्या जातील.पत्रकार मित्रांनी कुटुंबासह उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य, प्रकाश टाकळकर,विद्याचंद्र सातपुते, प्रकाश आरोटे, गोकुळ कानकाटे, गणेश आवारी, राजू जाधव, अल्ताफ शेख आदी पदाधिकारी यांनी केले आहे.