शिवथर – बोरखळ, ता. सातारा येथे नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने औषध फवारणी करण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
याबाबत अधिक वृत्त असे, मागील काही दिवसांपासून वातावरणाच्या बदलामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. यावेळी गावच्या लोकांना डेंग्यूच्या साथीमुळे दवाखान्यांमध्ये दाखल करण्यात आले आहे.
काही लोकांचे उपचार सुरु होते हा आकडा मोठ्या प्रमाणात असल्याचे निदर्शनास आले होते. या परिस्थितीची दखल घेऊन माजी उपसरपंच पुरुषोत्तम शिर्के यांनी वेळीचे लक्ष दिले आणि तात्काळ ग्रामसेवकांशी फोनवरून चर्चा केली.
त्यानंतर आशासेविका, आरोग्य विभागाचे आरोग्य सहाय्यक टोणपे, ग्रामपंचायत शिपाई गौरव नलवडे यांनी प्रत्येक घरी जाऊन पाण्याचे नमुने तपासणी केली.
दोन-तीन दिवस घरी भेटून नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याबरोबरच जास्त दिवसांचे पाणी ड्रम, मोठे पिंपामधील पाणी ओतून देण्यास सांगितले. त्यानंतर गावामध्ये आरोग्याच्या दृष्टीने दोन दिवस ग्रामपंचायतीचे शिपाई गौरव नलवडे यांनी फॉगिंग मशीनच्या साहाय्याने औषध फवारणी केली. औषध फवारणी झाल्यामुळे गावातील तसेच वाडी-वस्तीवर नागरिकांनी समाधान व्यक्त केले.