वालचंदनगर / रेडा -इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर कंपनीने येथील पोलीस ठाण्याला सॅनिटायझर फवारणी यंत्र मोफत दिले.
याचा प्रारंभ करुन पशुसंवर्धन दुग्धविकास व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते बसवण्यात आले आहे.कंपनीने स्वतः विकसित केलेले सॅनिटायजेशन फवारणी यंत्र पोलीस ठाण्यासमोर मोफत बसवले आहे.
दरम्यान आरोग्य विभाग व पोलीस कर्मचाऱ्यांसाठी जिल्हा परिषद सदस्या वैशाली पाटील यांच्या माध्यमातून मास्क व सॅनिटायझरचे वाटप राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील, वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, वालचंदनगर कंपनीचे अधिकारी धीरज केसकर, वाल्मिक शुक्ला आदी कर्मचारी पोलिस मोठ्या संख्येने उपस्थित होते.