दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा गेल्या काही दिवसांपासून खूपच चर्चेत आहे. अलिकडेच ती पुष्पा द राइज या चित्रपटामध्ये एका आयटम साँग मध्ये दिसून आली. समंथा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. शिवाय अभिनेत्री तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देते. नुकताच समंथानं वर्क आऊट करतानाचा व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये ती नो मेक-अप लूकमध्ये दिसत आहे. अभिनेत्रीचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
समंथा व्हिडीओमध्ये दिसत आहे की तिचा ट्रेनर तिच्या समोर एक स्टिक फिरवत आहे. या वर्कआऊटचे नाव ‘नागिन मोबिलिटी ड्रिल’, असं आहे. या व्हिडीओमध्ये समंथा ब्राऊन कलरच्या आऊटफिटमध्ये दिसत आहे. हा वर्क-आऊट करतानाचा व्हिडीओ शेअर करून समंथानं कॅप्शनमध्ये लिहिले, ‘माझा फिटनेस ट्रेनर हा तुमच्या फिटनेस ट्रेनरपेक्षा वेडा आहे. या वर्क-आऊटला नागिन मोबिलिटी ड्रिल म्हणतात. ‘
दरम्यान फिटनेस फ्रिक समंथाच्या या ‘नागिन स्टाईल’ वर्क- आऊटची जोरदार चर्चा झाली आहे. समंथा फिटनेसच्या बाबतीत जागरूक असते तिच्या डाएटमध्ये ड्राय फ्रूट आणि चिया सिड्सचा समावेश करते.