मुंबई – अभिनेता सलमान खानला एका बिनविषारी सापाने दंश केल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पनवेलमधील सलमान खानच्या फार्महाऊसमध्ये शनिवारी रात्री हा सर्पदंश झाला होता. त्यानंतर सलमान खानला नवी मुंबईतील कामोथे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्राथमिक उपचार केल्यावर अवघ्या 6 तासांनी म्हणजे आज सकाळी त्याला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.
सोमवारी सलमानचा 56 वा वाढदिवस आहे. तो साजरा करण्यासाठी तो पुन्हा पनवेलच्या आपल्या फार्म हाऊसवर जाणार आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त फार्महाऊसवर अनेक सेलिब्रिची येणार असल्याचे समजते आहे.