एक तारा निखळला ! ज्येष्ठ साहित्यिक प्रा. तु. शं. कुलकर्णी यांचे निधन

नांदेड – जुन्या पिढीतील ज्येष्ठ साहित्यिक प्रा. तु. शं. कुलकर्णी यांचे शनिवारी नांदेड येथे वार्धक्‍यामुळे निधन झाले. ते 89 वर्षे वयाचे होते. तु. शं. हे सरस्वती भुवन महाविद्यालय औरंगाबाद इथे मराठी विषयाचे प्राध्यापक होते. मराठवाडा साहित्य परिषदेचे ते माजी अध्यक्ष, मराठवाडा साहित्य परिषदेच्या प्रतिष्ठान या मासिकाचे संपादक म्हणून ही त्यांनी काम पाहिले आहे.

मसापच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले होते. त्यांना मसापचा जीवन गौरव आणि नांदेड जिल्हा परिषदेचा नरहर कुरुंदकर साहित्य पुरस्कार मिळाला होता. “तृणाची वेदना’, “ग्रीष्मरेखा’, अखेरच्या वळणावर’ हे कुलकर्णी यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. तर, “स्वातंत्र्योत्तर मराठी कविता’ या ग्रंथाचे त्यांनी साहित्य अकादमीसाठी संपादन केले आहे.

मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य, महाराष्ट्र राज्य ग्रंथ पुरस्कार समिती सदस्य, नव लेखकांना अनुदान देणाऱ्या साहित्य संकृती मंडळाचे तज्ज्ञ परीक्षक, राज्य नाट्य प्रयोग परीक्षक, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संकृती मंडळ सदस्य अशा विविध जबाबादाऱ्या त्यांनी सांभाळल्या होत्या.

त्यांच्या इच्छेनुसार नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास देहदान करण्यात आले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.